
नगरपालिकेतील सफाई व इतर 55 कर्मचारी कमी केल्याची बातमी समजताच शिवसेना आक्रमक
दहीहंडी व गणेश उत्सवाच्या तोंडावरती रत्नागिरी नगर परिषदेने कर्मचारी कपात केल्यामुळे कचरा गाड्या उशिराने लोकांकडे दुपारी जात आहेत त्यामुळे नागरिकांचा अडचण निर्माण होत आहे, ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेले खड्डे तात्काळ बुजवावेत अशी सूचना केल्या गेल्या, शिळ धरणा वरील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एक्सप्रेस फिडर वरील वीजपुरवठा एमएसईबी च्या हलगर्जीपणामुळे वारंवार खंडित होतो तो खंडित न होता वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे जेणेकरून नगरपालिकेतील लोकांच्या पाण्याची गैरसोय होता कामा नये ही बाब लक्षात येताच शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित व शहर प्रमुख बिपीन बंदरकर उपजिल्हाप्रमुख राजन शेटे,महिला शहर संघटक स्मितलताई पावसकर यांच्या नेतृत्वाखाली निमेश नायर, दीपक पवार,संजय हळदणकर,बंटी कीर,राकेश नागवेकर,अभिजीत दुडे, सौरभ मुलुष्टे, मनोज साळवी, मनीषा बामणे, हेमंत जाधव व इतर शिवसैनिक यांनी माननीय मुख्याधिकार्यांची भेट घेतली लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा अशी भूमिका शिवसेनेची आहे.

