जिल्हा आरोग्य विभागाने सुरू केलेल्या जिल्ह्यातील ६०६ हिरकणी कक्षांचा मातांना मोठा आधार


जिल्हा आरोग्य विभागाने स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्तनपान सप्ताहानिमित्ताने जिल्हाभरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालये तसेच जिल्हा रूग्णालयांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमुळे मातांना संकोच न बाळगता बाळाला स्तनपान देणे शक्य झाले आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ६०६ हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
या सरकारी सुविधांव्यतिरिक्त, जिल्ह्यातील अनेक शासकीय व खाजगी कार्यालये, दवाखाने, रेल्वे स्थानक, बसस्थानके व मॉल्समध्येही अशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या उपकरणामुळे स्तनदा मातांना मोठा दिलासा मिळाला असून बाळाला योग्य पोषण मिळण्यसही मदत होत आहे.
बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी व स्तनदा मातांना स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button