
चिपळूण शहरात गुहागर बायपासजवळ गांजा सेवन करणार्या दोघांवर गुन्हा
चिपळूण शहरालगतच्या गुहागर बायपास मार्गावरच्या जंगलमय भागात शनिवारी सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास गांजा सेवन करणार्या दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंमद सामी गफफर महालदार (२५), सैफान लियाकत महालदार (२६, दोघे चिवेली बंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद रूपेश उल्हास जोगी, वृशाल सगुण शेटकर यांनी दिली. महमद व सैफान हे दोघेजण गांजा सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून त्या दोघांवर धाड टाकली.
अंमली पदार्थाच्या आहारी तरूणपिढी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलामार्फत सर्वत्र धडक कारवाई केली जात आहे, असे असतानाही या अंमली पदार्थांची आजही विक्री होत असून सर्रासपणे तरूण पिढी त्याचे सेवन करत असल्याचे चित्र आहे.
www.konkantoday.com