
गावखडीत बेकायदा बंदूक बाळगणारा ताब्यात, गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी परिसरात विनापरवाना सिंगल बॅरल बंदूक आणि आठ जीवंत काडतुसे जवळ बाळगणार्या एका ६२ वर्षीय व्यक्तीविरूद्ध पूर्णगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली असून एकूण २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नरेश भिकाजी गुरव (६२, रा. गुरववाडी, गावखडी) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरूद्ध शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ (१) २५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश झोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरव हा गावखडी येथील गुरववाडी ते पवारवाडीकडे जाणार्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या डुबलाची धार या ठिकाणी संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडे परवाना नसलेली सिंगल बॅरल बंदूक आणि आठ जीवंत काडतूसे सापडली.
www.konkantoday.com