
अमेरिकेच्या कृषी उत्पन्नावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या घोषणेमुळे कोकणातील पल्प उद्योगाला फटका बसणार
अमेरिकेने भारतासह काही देशांच्या कृषी उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाचा थेट फटका कोकणातील हापूस आंब्याच्या पल्प उद्योगाला बसणार आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हापूस पल्प अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात केला जातो. मात्र टॅरिफमुळे पल्लपची किंमत सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार असल्याने निर्यातदारांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
दरवर्षी भारतातून सुमारे १५ हजार मेट्रीक टन आंबा पल्प निर्यात होतो. यातील जवळपास ३०० कोटी रुपयांचा हिस्सा अमेरिकेच्या बाजारात जातो. यामध्ये केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतूनच जवळपास ५० कोटी रुपयांचा हापूस पल्प परदेशी जातो. आता नव्या टेरिफमुळे सुमारे १२.५ कोटी रुपयांचा अतिरिक्त कर लागणार आहे. परिणामी अमेरिका बजारात हा पल्प महाग होणार असून त्याची मागणी कमी होण्याची भीती व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com




