
रत्नागिरी रिल्स स्पर्धा २०२५ : बक्षीस वितरणसमारंभ,रत्नागिरीतील हे आयोजन निश्चितच ‘रोल मॉडेल’ ठरेल!:उदयजी सामंत
अंबर हॉल, टी.आर.पी., रत्नागिरी येथे ‘रत्नागिरी रिल्स स्पर्धा २०२५’ च्या बक्षीस वितरण समारंभाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिभावान युवा कलाकारांच्या अद्वितीय सादरीकरणाने मनाला स्पर्श केला. अल्पवेळात प्रभावी संवाद साधण्याचं सामर्थ्य या नव्या पिढीत आहे हे पाहून अभिमान वाटला. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या प्रणय, राहुलजी पंडित, कांचनताई नागवेकर, मुळे सावंत परीक्षक मंडळी, आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!


‘चला हवा येऊ द्या’मध्ये निवड झालेला सचिन काळे याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो – कोणत्याही वशिल्याशिवाय ग्रामीण भागातून मुंबईच्या रंगमंचापर्यंत त्याची झेप ही प्रेरणादायी आहे.मराठी भाषा, कोकणचं वारसातत्त्व, रत्नागिरीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा, आणि येथील तरुणाईची विद्वत्ता — याचं जतन करत आपण जगासमोर एक आदर्श उभा करू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ सोशल मीडियाच नाही, तर समाजप्रबोधन, शिक्षण, आणि संस्कृती जपण्याचा अनोखा संदेश देणारे रत्नागिरीतील हे आयोजन निश्चितच ‘रोल मॉडेल’ ठरेल!
आयोजकांचे, सहभागी स्पर्धकांचे आणि सर्व उपस्थितांचे आभार. अशी स्पर्धा भविष्यात देशातील सर्वांत मोठी स्पर्धा होवो, हीच शुभेच्छा, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
