सरन्यायाधीश भूषण गवईंचा पुढाकार, आशीर्वादामुळेच स्वप्न सत्यात, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे सदस्य ऍड.. संग्राम देसाई

मागील ४० वर्षापासून चालत असलेल्या एका प्रदीर्घ लढ्याला आज अखेर यश आले. आम्हा सर्वांसाठी आदरणी असलेले या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यासाठी खूप पुढाकार घेतला. केवळ आणि केवळ त्यांच्या आशिर्वादामुळेच हे स्वप्न सत्यात उतरल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे सदस्य ऍड.. संग्राम देसाई यांनी व्यक्त केली.कोल्हापूर आणि कोकणसाठी आजचा हा दिवस खर्‍या अर्थाने सोनियाचा दिन असल्याचे ते म्हणाले. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अशोक आराध्ये आणि त्यांचया सर्व सहकार्‍यांनी दिलेले योगदानही तेवढेच  महत्वपूर्ण ठरल्याचेही त्यांनी सांगितले.या कोल्हापूर खंडपीठाच्या घोषणेबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, जरी सर्वोच्च न्यायालयने या खंडपीठाला मंजुरी दिली असली तर महाराष्ट्र शासनाचीही यामध्ये महत्वपूर्ण भूमिका असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमपासून ते आतापर्यंत आमच्या या लढ्याला, आमच्या मागण्यांना पूर्ण सपोर्ट केला. केवळ आणि केवळ त्यामुळेच हे स्वप्न सत्यात उतरल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button