
वाटद एमआयडीसीबाबतीत संबंधित अधिकारी व स्थानिकांशी चर्चेनंतर मनसे भूमिका जाहीर करणार
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसी बाबतीत अनेक मतंमातंतर पुढे येऊन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती. या भागात मनसेची ताकद लक्षवेधी असतानाही आजवर याविषयी मनसेने आपली भूमिका अजून जाहीर केलेली नव्हती. तेथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबतच्या चर्चेनंतर मनसे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबतच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष प्रकल्प कसा आहे याची माहिती घेऊन स्थानिक गग्रामस्थांसोबत त्यांची भूमिका काय आहे? मागणी काय आहे? याची माहिती घेऊन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळवली जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही विकास कामाच्या आड किंवा कोणत्याही प्रकल्पच्या आड कधीही येत नाही कायम सहकार्याच्या भूमिकेत असते. मनसे अध्यक्ष कायम सांगतात की राज्यात प्रकल्प आले पाहिजेत तरच त्या भागाचा विकास होतो. पण आजवर कोकणात नेहमीच प्रकल्प जाहीर होतो, जागा ताब्यात घेतल्या जातात व वरिष्ठ पातळी वरील हालचाली नंतर प्रकल्प गुंडाळले जातात. त्यामुळे कोकणातील जागा आकारण परप्रांतीयांच्या ताब्यात जाते.
मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील जागा सहज देऊ नाका विकू नका त्याऐवजी भागीदारी मागा स्थानिक तरुणांना भरती करून घेण्याची अट घाला, असे आवाहन केले होते. त्याआधारेच जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी २ ऑगस्ट रोजी महेंद्र गुळेकर, अरविंद मालाडकर, सचिन शिंदे व वाटदमधील पदाधिकाऱ्यांसोबत बोलून ही भूमिका जाहीर केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच कोणत्याही प्रकल्प बाबतीत स्थानिक जनतेला काय हवे आहे किंवा त्यांची भूमिका काय आहे तिचं भूमिका घेत आली आहे हे नाणार प्रकल्प वेळी दिसून आले होते. पण जिंदाल कंपनी चा कारभार पाहता स्थानिक जनतेच्या भावना जाणून घेऊन त्याबाबतीत राज साहेबांच्या सोबतच चर्चा करून आम्ही आमची भूमिका जाहीर करू. शेवटी काय जनतेचे समर्थन असेल तर आमचे देखील असेल. जनतेचा विरोध असेल तर आमचा ही असेल आणि मनसेचा विरोध कसा असतो ते संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, असे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी सांगितले.