
लांजा-पराडकरवाडी येथे साखळी चोरीप्रकरणी शेजार्यावर गुन्हा
शेजारील तरूणाच्या घरात घुसून त्याच्या घरात कपाटातील ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना रूण पराडकरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची तक्रार प्रणय संजय पराडकर (२५, रा. रुण पराडकरवाडी, ता.लांजा) याने लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. प्रणय याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेजारी राहणार्या ऋषिकेश अंकुश पराडकर (२७, रा. रूण पराडकरवाडी) याने ५ जुलै सायंकाळी ७ ते २४ जुलै रोजी सायंकाळी ७ या कालावधीत प्रणय याच्या घरात दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडून घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरून नेली. याबाबत प्रणय पराडकर याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ऋषिकेष पराडकर याच्यावर भारतीन न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com