
रत्नागिरीत कांचन डिजिटल’च्या गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला शहरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा केवळ एक कला स्पर्धा नसून, सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे, अशा शब्दांत पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेतून साकारलेल्या सुंदर गणेशमूर्तींचेही सामंत यांनी कौतुक केले. रत्नागिरीतील रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी ही स्पर्धा पार पडली. यावेळी ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी दोन तासांत मन लावून गणेशमूर्ती साकारल्या. पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी बेहरे, रत्नागिरी अर्बन बँकेचे सीईओ तुपे, उद्योजक प्रसन्न आंबुलकर, गणेश धुरी, नमन ओसवाल, रोहित विरकर, मुकेश गुंदेजा , निलेश नार्वेकर, सचिन देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेची पार्श्वभूमी बाबत कांचन डिजिटल’चे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांपासून ते घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहेत.

या स्पर्धेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बालमूर्तिकारांसाठीही स्पर्धा आयोजित करण्याची मागणी जोर धरत होती. त्याला मान देऊन यंदा प्रथमच मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला.. या स्पर्धेदरम्यान मूर्तिकार दीपक भडेकर (संदेश आर्ट्स) यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यामुळे विद्यार्थ्यांना मूर्ती बनवताना विशेष मदत मिळाली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवा पाटणकर, ओंकार पाटणकर, नरेश पांचाळ , आशिष संसारे आणि संजय शिंदे यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र पाटील, मुकेश गुंदेजा, शकील गवाणकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, बाबू चव्हाण, अभिजीत नांदगावकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.स्पर्धेचा निकालस्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन करण्यात आला. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेतप्रथम क्रमांक: रुद्र राजेंद्र गुरव द्वितीय क्रमांक: कनक संतोष सातवेकर तृतीय क्रमांक: स्वराज प्रशांत नाचणकर.विशेष उल्लेखनीय पारितोषिके: ओवी किरण वाडेकर, शुभ्रा विरेंद्र विखारे, स्वराज सचीन गोताड, सारा पराग राऊत, ओम शैलेंद्र तोडणकर.उत्तेजनार्थ पारितोषिके: इशान साईनाथ नागवेकर, केयुर तुळसवडेकर, प्रेम संतोष चंदेरकर, प्रचिति संगम मयेकर, सक्षम संदीप मोसंबकर, ओम विनोद जोशी, स्वरा राजेंद्र जाधव, रुद्र सचिन पवार, पार्थ विशाल कोठेकर, सिद्धी विनोद कांबळे.