
मांजराला वाचविण्यासाठी महिला थेट बिबट्याला भीडली
संगमेश्वर तालुक्यातील नावडी बाजारपेठ परिसरात सरिता यल्लपा शास्त्री यांच्या मांजरावर बिबट्याने हल्ला चढवला असता सरिता यांनी धाडस दाखवत बिबट्याला परतवून लावले. ही घटना नुकतीच घडली.
रात्रीच्या वेळी झाडीतून अचानक बिबट्या बाहेर पडला आणि मांजरीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत सरिता शास्त्री यांनी बिबट्याला पिटाळले व मांजरीचे प्राण वाचवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या ठिकाणी पुरेशी प्रकाशयोजना करण्याची मागणी केली आहे.
www.konkantoday.com