
प्रभाग क्रमांक 14 तेली आळी रत्नागिरी शहर मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वह्या वाटपाचे स्तुत्य उपक्रम 💥
♦️भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा. प्रदेशाध्यक्ष श्री . रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रेरणेतून आज गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात अल्पसंपन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाले.♦️
✨विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांच्या मुलांचाही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग होता ज्यामुळे सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.✨
💮या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना मोठी स्वप्नं बाळगा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घ्या असे मोलाचे मार्गदर्शन केले.💮
🌟शहराध्यक्ष दादा ढेकणे, प्रमुख पाहुणे श्री. उदयजी बसणकर, विक्रम जैन, अमित विलणकर, सत्यवती बोरकर, वैभवी शिवलकर, अज्जू हूनेरकर आणि समीर वस्ता छगन जी छिपा यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.🌟
✌️हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.✌️