
चिपळूण नगर परिषदेची अतिक्रमण विरोधात मोहीम सुरूच, फळविक्रेत्यांना दणका
चिपळूण नगर परिषदेने आपली अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच ठेवली असुन गुरूवारी बाजारपेठेत वाहतुकीला अडचण करणार्या हातगाडीवरील फळविक्रेत्यांना दडका दिला. ९ गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यांचे नुकसान नको म्हणून फळे परत देण्यात आली आहेत. तर पळून गेलेल्या अन्य विक्रेत्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासाने सांगितले आहे.
मध्यंतरी थांबलेली अतिक्रमणविरोधी कारवाई गेल्या चार दिवसांपूर्वी पुन्हा सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक ते चिंचनाका परिसरातील अतिक्रमण तोडण्यात आले. तर दुसर्या दिवशी अन्य भागातील व्यावसायिकांना सूचना देण्यासह अनधिकृत लावलेले फलक जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने व कारवाई झालेल्या व्यावसायिकांची चर्चा झाली. यामध्ये घातलेल्या अटींचे पालन करण्यासह पुन्हा जागेसाठी मारामारी न करण्याची हमी व्यवसायिकांनी दिल्याने ते मध्यवर्ती बसस्थानक ते भोगाळे परिसरात पुन्हा बसले आहेत.
www.konkantoday.com