
कॉंग्रेसच्या जिल्हा समन्वयक म्हणून सुरेश कातकर यांची नियुक्ती
कॉंग्रेसने उत्तर आणि दक्षिण असे जिल्ह्याचे विभाजन करून त्यानुसार दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर आता या दोन जिल्हाध्यक्षांमध्ये शुक्रवारी जिल्हा समन्वयाची नव्याने एक एन्ट्री झाली आहे. या दोन्ही जिल्हा कॉंग्रेस कमिट्यांमध्ये सुत्रबद्धता आणि एकात्मता रहावी म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा समन्वयक म्हणून माजी जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर यांनी नियुक्ती शुक्रवारी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पुरेसे यश न मिळाल्याने पक्षांतर्गत फेरबदल करताना अखिल भारतीय कॉंग्रेस किमिटीने रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीसाठी सोनलक्ष्मी घाग आणि नुरूद्दीन सय्यद यांची जिल्हाध्यक्ष म्हणून तीन दिवसांपूर्वी निवड करण्यात आली.
नवीन बदलानंतर कॉंग्रेसमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता या दोन जिल्हाध्यक्षांमध्ये जिल्हा समन्वयक निर्माण करून त्याची धुरा गेली अनेक वर्षे जिल्हा आणि प्रदेश पातणीवर कायम कार्यरत असलेल्या कातकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईत कातकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दोन्ही जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस कमिट्यांमध्ये सूत्रबद्धता व एकवाक्यता रहावी यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या आदेशावरून कातकर यांची निवड करण्यात आली आहे.
www.konkantoday.com