
कामथे येथे रेल्वे स्टेशन नजिक रेल्वेच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू
कामथे येथे रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या बोगद्याजवळ एका ७२ वर्षीय वृद्धाचा मृतदेह सापडल्याची घटना गुरूवारी सकाळी ११.४० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनंत सोमा पडवेकर (७२, कुंभारखाणी) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंत पडवेकर यांना मंगला एक्सप्रेस या रेल्वेची धडक बसल्याने यात त्यांना गंभीर दुखापत झाली, यातच त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com