समाजसेवेची खरी ओढ असलेल्यांनीच लायन्समध्ये यावे : पीएमजेएफ ला. जगदीश पुरोहित

लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार : ला. नितीन कुलकर्णी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

रत्नागिरी : “समाजसेवा ही आकर्षण म्हणून नव्हे, तर आत्मिक प्रेरणेने केली पाहिजे. ज्यांना समाजासाठी वेळ आणि साधनं द्यायची तयारी आहे, अशा लोकांनीच लायन्स क्लबमध्ये यावं,” असा स्पष्ट आणि परखड संदेश पी.एम.जे.एफ. ला. जगदीश पुरोहित यांनी दिला. लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या २०२५-२६ या कार्यकालासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

हा शपथविधी सोहळा रत्नागिरी येथील हॉटेल कार्निव्हल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एमजेएफ ला. पराग पानवलकर, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन, बीओडी ला. प्रविण मलुष्टे, ला. जयंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुरोहीत म्हणाले, “समाजसेवेचा खरा अर्थ समजून घेणारे, आपल्या कुटुंब व व्यवसायातून वेळ काढणारे आणि समाजाला काहीतरी परत देण्याची खरी भावना बाळगणारे लोकच लायन्स क्लबमध्ये यावे. केवळ प्रतिष्ठेसाठी किंवा ओढूनताणून कोणीही चांगला समाजसेवक होऊ शकत नाही.”

या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी एम.जे.एफ. ला. नितीन कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. सचिव म्हणून ला. धनश्री पालांडे आणि खजिनदार म्हणून ला. अभिजीत पडित यांनी शपथ घेतली.

नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून ला. प्रथमेश गायकवाड, द्वितीय उपाध्यक्ष ला. श्रीकांत पाटील, सहसचिव ला. प्रदीप मोरे, जनसंपर्क अधिकारी ला. वैभव पाटील, टेल ट्विस्टर ला. सुर्यकांत जाधव, आणि टेमर म्हणून ला. भक्ती गायकवाड यांचा समावेश आहे.

नवीन संचालक मंडळात ला. सौ. रश्मी मलुष्टे, ला. जयश्री जोशी, ला. अमित पटेल, ला. जितेंद्र पटेल, ला. हितेश पटेल, ला. निलेश पटेल, ला. वसंत पटेल, ला. दर्शन पवार, ला. जानव्ही पवार, ला. निवृत्ती खरवटकर आणि ला. वृषभ खरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध होते. शपथविधीनंतर नवनियुक्त अध्यक्ष ला. नितीन कुलकर्णी यांनी पुढील वर्षात समाजोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरं, विद्यार्थ्यांसाठी मदतीचे उपक्रम आणि पर्यावरणपूरक मोहिमा राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. उपस्थित सदस्यांमध्ये नवचैतन्याची भावना निर्माण झाली असून, लायन्स क्लबच्या समाजहिताच्या कार्याला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button