
शालेय जीवनात कबड्डी खेळणारा कार्यकर्ता आज पंचांच्या सन्मानासाठी उभा राहतो, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट:उदयजी सामंत
आज रत्नागिरी मतदारसंघात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पंच शिबीर २०२५ या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना सर्वप्रथम, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आणि एक रत्नागिरीकर म्हणून मी आपले मन:पूर्वक स्वागत करतो!
आजचा दिवस माझ्यासाठी फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता, तर माझ्या क्रीडा जीवनातील आठवणी आणि कबड्डीवरील प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले. शालेय जीवनात कबड्डी खेळणारा कार्यकर्ता आज पंचांच्या सन्मानासाठी उभा राहतो, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
कबड्डीला केवळ एक खेळ म्हणून न बघता, ती आपल्या संस्कृतीचा, आत्मतेजाचा भाग आहे. त्यासाठीच, मी रत्नागिरीमध्ये फक्त कबड्डीसाठी खास स्टेडियम उभारण्याचा संकल्प घेतला आहे. या स्टेडियममध्ये कोणताही दुसरा खेळ खेळला जाणार नाही असा शब्द मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी बोलताना दिला.
कुठलीही हुकूमशाही संघटनांमध्ये येऊ नये, लोकशाही आणि खेळाचा सन्मान टिकला पाहिजे हा संदेश देत शेवटी, या शिबिरासाठी मेहनत घेतलेल्या सर्व संघटक, पंच, खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार.
तसेच, महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राला भक्कम आधार देणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचेही विशेष आभार मानतो, असेही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.