
धामणी येथील “निसर्ग कोकण मेवा” या काजू फॅक्टरीमध्ये भीषण आग ,साठ लाखाचेनुकसान
धामणी येथील “निसर्ग कोकण मेवा” या काजू फॅक्टरीमध्ये भीषण आग लागण्याचाप्रकार घडला आहे,
धामणी येथे शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
धामणी येथील चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या “निसर्ग कोकण मेवा” या काजू फॅक्टरीमध्ये सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. नेहमीप्रमाणे फॅक्टरी सुरू करण्याच्या वेळी ग्रामस्थांना आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यांनी तातडीने बांबाडे यांना याची माहिती दिली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीमुळे फॅक्टरीतील काजू सोलण्याची महागडी यंत्रसामग्री, तीन हजार किलो काजू गर आणि १० टन कच्च्या काजू बिया तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच्या या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.