
दिनेश डोर्लेकर यांचा शिक्षण परिषद मध्ये सन्मान.
▪️गावडे आबेरे खारवीवाडा ( डोर्लेकरवाडी) येथील खारवी समाजातील सुपूत्र हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारे,क्रियाशील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे श्री दिनेश बाबाजी डोर्लेकर गुरुजी यांना रत्नागिरी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जि प शाळा आदर्श वसाहत कारवांची वाडी नंबर दोन या शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा कुमार शुभम संभाजी गायकवाड याची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली.
▪️इयत्ता पाचवीच्या वर्गाचे मार्गदर्शक श्री दिनेश बाबाजी डोर्लेकर यांचे पोमेंडी बीट व नगरपरिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिक्षण परिषदेत हे सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
▪️यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री किरण लोहार शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती शिरभाते कोकण बोर्ड सहाय्यक सचिव श्रीमती प्रेरणा शिंदे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रत्नागिरी, श्री सोपनूर आणि ओमेंडी बीट विस्तार अधिकारी प्राध्यापक श्री मुरकुटे विस्तार अधिकारी श्री गावन यांच्या उपस्थितीत सदर सन्मान प्रदान करण्यात आला
▪️या त्यांच्या यशामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सावंत उपशिक्षिका श्रीमती रेणुका उपाध्याय यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे हे सांगायला डोर्लेकर गुरूजी विसरले नाहीत त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.