दापोली तालुक्यातील फणसू गावात एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

दापोली तालुक्यातील फणसू गावात एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनस्वी महेश बेर्डे असं या अल्पवयीन मुलीचं नाव असून, मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनस्वी बेर्डे २५ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या फणसू येथील घरासमोर ॲक्टिवा मोटारसायकल चालवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडीसह खाली पडली. या अपघातात तिच्या पायाला, मांडीला, गुडघ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली.

तात्काळ तिला उपचारासाठी दापोलीतील सोनजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी तिला म्हात्रे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिची गंभीर अवस्था पाहून तातडीने ऑपरेशनसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मनस्वीला मुंबई येथे दाखल करण्यात आले.

दुर्दैवाने, २७ जुलै रोजी सायंकाळी ६:५० वाजता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button