
जल फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली जल फाऊंडेशनचे १५ रोजी उपोषण
मध्य रेल्वेसह कोकण रेल्वेकडे गेल्या ४ वर्षापासून कोकण विभागातील प्रवाशांना सतावणार्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर जल फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी येथील रेल्वेस्थानकासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. या उपोषणाच्या प्रक्रियेला आतापासूनच सर्वच स्तरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे.
४ डबे संकणीकृत आरक्षणासाठी उपलब्ध करून देत रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत चालवण्यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. मडगावहून मुंबईला जाणार्या वंदे भारत एक्सप्रेस आणि करमाळी-एलटीटी या एक्सप्रेस गाड्यांमध्ये रत्नागिरी रिमोट आरक्षण कोटा एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतका वाढवावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
www.konkantoday.com