
गुहागरात उभी राहणार भव्य शिवसृष्टी व शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
गुहागर शहरातील विश्रामगृह समोरील छत्तीस गुंठे जागेचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्यात येणार असून बुधवारी आमदार भास्कर जाधव यांनी जागेची पाहणी करून अतिशय दिमाखदार शिवसृष्टी उभारण्याचा मानस व्यक्त केला.
गुहागरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरील मोकळ्या छत्तीस गुंठे शासकीय जागेवर ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या जागेमध्ये ही शिवसृष्टी उभारण्याचे निश्चित केले आहे. बुधवारी आमदार जाधव यांनी या जागेची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, आज तालुक्याच्या लोकसंख्येप्रमाणे जिल्हा नियोजनमधून निधी मिळत असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. आपण या शिवसृष्टी उभारणीसाठी निधी आणणारच असे सांगत सदर छत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी मालवण येथे नव्याने उभारणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारालाच हे काम देण्याचे निश्चित करणार असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com