
खेडमध्ये मायक्रो फायनान्सचा महिलांवर अन्याय? महिलांनी गाठले पोलीस ठाणे
खेड तालुक्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या धडाकेबाज वसुली पद्धतीविरोधात महिलांनी मोठा आवाज उठवत थेट खेड पोलीस ठाण्याचे दार ठोठावले. तरूणींपासून वृद्ध महिलांपर्यंत असंख्य महिला मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात अडकल्या असून वसुली दरम्यान होत असलेल्या अवैध कारवायांविरोधात त्यांनी एकत्र येत पोलिसांकडे तक्रार दिली.
या महिलांनी खेड पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांची भेट घेवून सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते फायनान्स कंपन्यांचे वसुली कर्मचारी दमदाटी करतात, अपमानास्पद वर्तन करतात आणि बेकायदेशिररित्या रात्री अपरात्री घरात शिरतात. त्यांच्याकडून महिलांना मानसिक त्रास देण्यात येतो. अशा गंभीर तक्रारी करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी तक्रार ऐकून घेतल्यानंतर संबंधित फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधीला थेट पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की, कर्ज वसुली ही नियमांच्या चौकटीत राहूनच करावी लागेल.www.konkantoday.com