
कोणत्याही परिस्थितीत आराखडा रद्द होणार नाही, मात्र त्यात आवश्यक ते बदल केले जातील -आ. किरण सामंत
लांजा शहर विकास आराखड्यावरून सुरू असलेल्या राजकीय धुळवडीत लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आराखड्यात आवश्यक बदल करण्यात येतील, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. भविष्यात लांजा शहराच्या विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा आहे. मात्र काही लोकांना यात राजकारण करायचे आहे, अशा शब्दांत सामंत यांनी विरोधकांवर तोफ डागली.
येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी आमदार सामंत पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही ’दिवसांपासून लांजा शहर विकास आराखड्याला काही घटकांकडून विरोध होत असताना, काही जणांचा याला पाठिंबाही आहे. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर झालेल्या समन्वय मुख्याधिकारी बैठकीत आणि नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी काहींनी समन्वयाची तर काहींनी विरोधाची भूमिका घेतली होती मात्र, हा आराखडा रद्द होणार नाही. नागरिकांनी आवश्यक ते बदल सुचवावेत. त्याप्रमाणे त्यात बदल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com