
LPG ग्राहकांना महिन्याच्या सुरूवातीला दिलासा, गॅस सिलिंडर झाला स्वस्त!
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ३३.५० रुपयांची घट करण्यात आली आहे. हे नवे दर १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणार आहेत. मात्र, घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, कारण १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.