
वाशिष्टी नदीत उडी मारून नवदाम्पत्य आत्महत्या प्रकरण : 36 तासांनी पत्नीचा मृतदेह सापडला
चिपळूणमध्ये नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (30 जुलै) दुपारी ही घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला 36 तास उलटल्यानंतर पत्नीचा मृतदेह सापडला या घटनेतील पती निलेश अहिरे (वय 26) आणि पत्नी अश्विनी अहिरे (वय 19) हे आहेत. त्यांचे लग्न अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी धुळे येथे मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नानंतर त्यांनी मारलेश्वर, गणपतीपुळे येथे देवदर्शन करून आनंदी क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण एक मोठे गूढ बनले आहे.सुमारे 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर, आज (1 ऑगस्ट) अश्विनी अहिरे यांचा मृतदेह कालू स्टे मजरेकाशी खाडी किनारी आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठवला आहे.