
वनविभागाच्या हरकतीमुळे रसाळगडावरील जनसुविधा केंद्राचे काम रखडले -रामचंद्र बाबू आखाडे
रसाळगड किल्ल्यावरील वनविभागाच्या हरकतीमुळे जनसुविधा केंद्राच्या थांबलेल्या कामाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ ऑगस्ट. २०२५ रोजी तहसिलदार कार्यालय खेड समोर महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेतर्फे आमरण उपोषण आंदोलन केले जाणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. हे उपोषण आंदोलन यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिवभक्त बांधव, शिवप्रेमी संघटना, सामाजिक , राजकीय संघटना, ग्रामस्थ मंडळ घेरारसाळगड यांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी केले आहे.www.konkantoday.com