
माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/विर नारी/विर माता/ विर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटक ऑगस्ट महिन्यात दौऱ्यावर
रत्नागिरी, दि.31 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यात माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/विर नारी/विर माता/ विर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटक माहे ऑगस्ट महिन्यात दौऱ्यावर येत असून, या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केला आहे. कल्याण संघटकांचा माहे ऑगस्ट महिन्यातील दौरा पुढीलप्रमाणे आहे.
दि.4,11,18 आणि 25 ऑगस्ट रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे कल्याण संघटक सुनिल कदम, मो.क्र.9413541588, दि. 7 आणि 22 ऑगस्ट रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे, मो.क्र.8210252830 आणि दि.14 आणि 29 ऑगस्ट रोजी कल्याण संघटक अनिल मोरबाळे आजी/माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दौऱ्यावर येणार आहेत.
वरील तारखेस अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्या सोबत डिस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ.ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन इ. कागदपत्रे सोबत आणावेत व सेवेचा लाभ घ्यावा.
000