
पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांना यश, रत्नागिरीची भरीव कामगिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांना यश मिळत असून, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरांची नोंद आहे. यामध्ये संकरित आणि अंगीकृत पशुधनाचा वाटा लक्षणीय असून, त्यामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होत आहे.
जिल्ह्यात ६ हजार ७०१ संकरित गाई, २९ हजार ४६ अंगीकृत गाई, आणि ११ हजार ७ अंगीकृत म्हशी नोंदल्या गेल्या आहेत. या जनावरांची दूध उत्पादन क्षमता अधिक असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात वाढ झाली आहे.
www.konkantoday.com