
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मोटार वाहन निरीक्षकांचे शिबीर
रत्नागिरी, दि.१ : जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मोटार वाहन निरीक्षकांचे ऑगस्ट २०२५ महिन्यात तालुक्यांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट कालावधीमध्ये हे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये मोटार वाहन निरीक्षक नागरिकांना सेवा देतील. या शिबिरांमुळे नागरिकांना आपल्या तालुक्यातच मोटार वाहन विभागाशी संबंधित कामे करणे सोयीचे होणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी कळविले आहे.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे चिपळूण: दि. ०५, १२, १९, २६ ऑगस्ट, खेड: दि. ०७, २१ ऑगस्ट, दापोली: दि.०६, २० ऑगस्ट, मंडणगड: दि. १३ ऑगस्ट, गुहागर: दि. १४ ऑगस्ट, देवरुख: दि.२२ ऑगस्ट, लांजा: दि. २८ ऑगस्ट, राजापूर: दि. २९ ऑगस्ट.