
ग्रामीण भागाचे मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत अनेक कर्मचार्यांची पदे रिक्त
रत्नागिरी जिल्हा परिषदेत वर्ग १ ते ४ पर्यंतच्या एकूण
२,७८९ पदे रिक्त असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. ३० जून २०२५ च्या आकडेवारीनुसार गट क मध्ये सर्वाधिक २,३०४, गट ड मध्ये ४३८, तर गट अ व ब मिळून ४७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे नागरिकांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत असून, विकासकामांनाही खीळ बसली आहे. शिक्षण विभागात १,२५९ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व आरोग्यसेविकांच्या रिक्त पदांमुळे संबंधित विभागांची कामे रखडली आहेत.
रिक्त असलेल्या पदांमुळे प्रत्येक विभागात कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत आहे. महत्त्वाचे निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी रखडत असून, जनतेची कामे वेळेवर पूर्ण होताना दिसत नाहीत. शिक्षण विभाग विभागातील प्राथमिक शिक्षकांची १२५९ पदे रिक्त असल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सारख्या गट अ अधिकार्याचे पद रिक्त असल्याने धोरणात्मक निर्णय आणि पर्यवेक्षणात उणीव भासत आहे. आरोग्य विभागातील आरोग्यसेविकाची २७० पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागांतील आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहेwww.konkantoday.com