
आयटीआय संगमेश्वर येथे सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) अभ्यासक्रम सुरू
संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी अंतिम मुदत १० ऑगस्ट
रत्नागिरी, दि.१ ) : पारंपरिक ऊर्जा स्त्रोत मर्यादित असल्याने आता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, सौर ऊर्जेचा वापर वेगाने वाढत आहे. सौर पॅनेल, सौर दिवे, सौर वॉटर हीटर, सौर चूल, सौर कंदील यांसारख्या सौर उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या नवीन अभ्यासक्रमामुळे तरुणांना रोजगाराची उत्तम संधी मिळणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम निवडण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी ०२३५४-२९९३४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर र.वि.कोकरे यांनी कळविले आहे.