
आपल्या सर्वांचे पाठबळ,प्रेम यामुळेच माझ्यात उर्जा निर्माण झाली…. इम्तियाज बिजापूरी
सिंधुदुर्ग…. गेली 38 वर्षे दूरदर्शन आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग येथे सेवा केल्यानंतर हाजी इम्तियाज बिजापूरी हे सेवानिवृत्त झाले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते,यावेळी मिळालेले प्रेम पाहून भावूक झालेले इम्तियाज बिजापूरी यांनी आपण प्रामाणिकपणे काम केले आणि या प्रवासात मला दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रातील अधिकारी,सेवकांनी मोलाची साथ दिली तसेच माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला साथ दिल्याने मी ही सेवा अतिशय प्रामाणिकपणे केली,आज आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.
सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रात एक छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी दूरदर्शन आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवर,कळमठ चे सरपंच,सदस्य, गोवा आकाशवाणी चे कर्मचारी तसेच संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जमीर खलफे,सचिव युसुफ शिरगावकर,बिजापुरी यांचे मित्र जावेद होडेकर कुटुंबासह उपस्थित होते.यावेळी हाजी इम्तियाज बिजापूरी यांचा संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला,यावेळी अध्यक्ष शकील गवाणकर यांनी बिजापुरी यांच्या स्वभावाच्या अनेक पैलू सांगत त्यांनी प्रचंड प्रमाणात लोकसंग्रह मिळविल्याचे सांगत त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे असे सांगितले,बिजापुरी हे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आहेत,यावेळी एनजीओ चे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र कृपाल उपस्थित होते.अनेक मान्यवरांनी बिजापुरी यांच्या कामाची प्रशंसा केली.