
*लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाने जोर केला होता त्यामुळे नदी नाल्यांचा प्रवाह वाढला होता लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी वहाळ पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली होती. केतन श्रीपत खेगडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशासन, ग्रामस्थानी शोध घेतला असता आज सकाळी 8 वाजता त्याचा मृतदेह गावातील सतीचा जाळ येथे आढळून आला.सविस्तर वृत्त असे की, प्रभानवल्ली येथे दोन सख्खे चुलत भाऊ वहाळ पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे दोघेही पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये सापडले. यापैकी एकजण सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला, मात्र दुसरा केतन श्रीपत खेगडे पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला होतं त्याचा शोध सुरू होता.




