
राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
या आठवड्यात बुधवार 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा
14 ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज ॲलर्टही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 ऑगस्टला अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




