
रत्नागिरीत पाऊस समाधानकारक
मे महिन्याच्या पूर्वार्धात पावसाला सुरूवात होवूनही राज्यातील ३५८ तालुक्यापैकी तब्बल २२५ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने या सार्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला असून पुरेशा पाण्याअभावी पिकांची स्थिती काहीशी अडचणीत असल्याचे वृत्त आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता मंडणगड, दापोली व रत्नागिरी तालुक्यात तुलनेत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत पडलेला पाऊस २५ टक्क्यांनी कमी आहे. दमट वातावरणामुळे काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.
www.konkantoday.com




