
दिल्लीतील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला भिले गावच्या सरपंच अदिती गुडेकर विशेष अतिथी
दिल्ली येथे १५ ऑगस्ट रोजी होणार्या स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमास भिले गावच्या सरपंच अदिती अविनाश गुडेकर यांची विशेष अतिथी म्हणून निवड झाली आहे. सरपंच गुडेकर यांनी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जलशक्ती अभियान अंतर्गत सर्वोत्तम काम केल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून दिल्ली येथील स्वातंत्र्यदिनाच्या विशेष कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातून एका सरपंचाची विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले जात आहे.www.konkantoday.com




