जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

रत्नागिरी : जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना गुरुवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. तब्बल १३ हजार ८३४ घरगुती तसेच ७ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. विसर्जन मिरवणुकांदरम्यान ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि फटाक्यांची आतषबाजी रंगत आणत होती. महिला, युवक तसेच बालगोपाळांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button