
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “कारगिल विजय दिवस” साजरा
रत्नागिरी, : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “कारगिल विजय दिवस” साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सैनिक रविराज हिलाल देवरे, माजी सैनिक अनुराजा पाटील, माजी सैनिक समिर शेख, माजी सैनिक शंकरराव मिलके, माजी सैनिक संतोष कांबळे, माजी सैनिक अरूण कांबळे, वीर पत्नी श्रीमती ऋतुजा महेश चिंगरे यांनी त्यांच्या सैनिकी जीवनातील अनुभव व शिस्त, देशातील सिमांच्या संरक्षणाचे महत्व, माजी सैनिकांना समाजामध्ये येणारे अनुभव याबाबत संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना माहिती दिली.
शिल्प निदेशक स्वप्ना धायगुडे यांनी भारतीय इतिहासातील वीरांचा इतिहास कथन केला. प्रशिक्षणार्थीनी कु. सारिका चव्हाण हीने कारगिर विजय महोत्सवाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमास सदस्य संस्था व्यवस्थापन समितीचे स्वनील सावंत व रोहित कांबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.
0000