
रेल्वेतून प्रवास करणार्या वैज्ञानिक महिलेचा डोळा लागला, चोरट्याने संधी साधली
धावत्या एक्सप्रेसमधून भारत सरकारच्या वैज्ञानिक महिलेला मोबाईल चोरीला गेल्याची घटना दि. २८ जुलै रोजी दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पडली. या प्रकारामुळे रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
राजश्री व्ही. पी. एम. श्रीधरण (३५, रा. केरळ) या कोझिकोडहून पनवेलला जात असताना मारूसागर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्यात झोपलेल्या असताना, अज्ञात चोरट्याने त्यांचा १५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना रत्नागिरी स्थानकावर गाडी थांबवलेली असताना दुपारी २ ते ३.१० दरम्यान घडली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३०५ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला हा गुन्हा पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता, मात्र पुढील तपासासाठी तो रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.www.konkantoday.com