
महसूल दिना’निमित्त आज आरोग्य तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबीर
‘
*रत्नागिरी, दि. ३१ : महसूल विभागाच्यावतीने जिल्ह्यात ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आणि महसुली वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी तसेच महसूल विभागाने केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमांचे तपशील:
- दिनांक ३१ जुलै २०२५: सकाळी ८:०० वाजता आरोग्य तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबीर अल्पबचत सभागृह, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
- दिनांक १ ऑगस्ट २०२५: सकाळी १० वाजता अल्पबचत सभागृह, रत्नागिरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
- दिनांक ०१ ऑगस्ट २०२५: जिल्हा नियोजन समिती सभागृह, रत्नागिरी येथे ‘महसूल दिना’चे मुख्य आयोजन करण्यात आले आहे.
महसूल विभागाने जिल्ह्यामध्ये महसुली कामे वेळेवर पूर्ण करणे, अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सर्व कामांचा आढावा या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्यात येणार आहे.