
मच्छिमार संभ्रमावस्थेत, वादळी वातावरणामुळे हुकणार मासेमारीचा मुहूर्त
कोकण किनारपट्टीवर नव्या मासेमारी हंगामाला अवघ्या दोन दिवसांत सुरूवात होणार असली तरी, सलग सुरू असलेल्या वादळी वार्यांनी आणि मुसळधार पावसाने मच्छिमारांची चिंता वाढवली आहे. येत्या १ ऑगस्टचा मासेमारीचा पारंपारिक मुहूर्त टळण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे. अनेक बोटी अजूनही किनारीच थांबून आहेत.
गेले दोन महिने मासेमारी बंदीमु बोटी किनार्यावरच शाकारून ठेवलेल्या होत्या. ३१ जुलैला ही बंदी संपत असल्याने मच्छिमारांनी नव्या हंगामाच्या स्वागतासाठी लगबग सुरू केली होती. बोटीची डागडुजी, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरूस्ती अशी कामे वेगाने सुरू होती. डिझेल, बर्फ, अन्नधान्याची जमवाजमव देखील अंतिम टप्प्यात होती. किनार्यावर जाळी विणण्यापासून ते होड्यांना तेल लावण्यापर्यंतची पारंपारिक कामेही जोमात होती.
मात्र जिल्ह्यावर अजूनही पावसाचा आणि सोसाट्याच्या वार्यांचा जोर कायम आहे. त्यामुळे बोटी समुद्रात उतरवाव्यात की नाही याबद्दल मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.www.konkantoday.com