बिल भरले नाही म्हणून नगरपरिषदेची वीज कापली तर महावितरणाने कर भरला नाही म्हणून नगर परिषदेने महावितरणकेंद्र बंद केले चिपळूणातील अजब प्रकार,

चिपळुणात पाणी व वीज दोन्ही सेवा ठप्प

बिल भरले नाही म्हणून नगरपरिषदेची वीज कापली तर महावितरणाने कर भरला नाही म्हणून नगर परिषदेने महावितरणकेंद्र बंद करण्याचा प्रकार चिपळूण शरद घडला आहे प सरकारच्या दोन खात्यातील संघर्षाचा फटका मात्र जनतेला बसला आहे
चिपळूण
नगरपरिषद व महावितरण यांच्यातील आर्थिक वादाचा थेट फटका चिपळूणशहरातील नागरिकांना बसू लागला आहे. आज सकाळी महावितरणने नगर परिषदेचे ३५ लाख रुपयांचे थकीत वीज बिल असल्याचे कारण देत पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन अचानकपणे कट केले. परिणामी शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला.
दरम्यान, यानंतर नगर परिषदेने पलटवार करत महावितरणच्या वीज वितरण उपकेंद्रावर कारवाई करत हे केंद्र सिल केले. नगर परिषदेचे म्हणणे आहे की, महावितरणकडून शहरातील ट्रान्सफॉर्मर व वीज खांबांच्या भाडेपोटी तब्बल ४५ लाखांची थकबाकी आहे. याच कारणावरून सायंकाळी नगर परिषद प्रशासनाने महावितरणचे उपकेंद्र सील करत कर्मचारी बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण शहराचा वीज पुरवठाही बंद झाला.

या दुहेरी कारवाईमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ना पाणी, ना वीज, अशा अवस्थेत नागरिक अंधारात आणि तहानलेले राहिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाच्या आपापसातील खटपटीत सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button