
निवळीतील शॉक लागून दोन जणांच्या मृत्यू मृत्यूप्रकरणी वायरमनवर गुन्हा
रत्नागिरी तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे रान साफ करताना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून झालेल्या दोघांच्या मृत्यूप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संबंधित वायरमनवर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप भिकाजी मायंगडे (रा. भोके-रत्नागिरी) असे या वायरमनचे नाव आहे. कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा अहवाल महावितरणकडून पोलिसांना पाठविण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान महावितरणकडून संबंधित शाखा अभियंता व वायरमन मायंगडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विदुलता वासुदेव वाडकर (६१) व चंद्रकांत यशवंत तांबे (४३, रा. निवळी, शिंदेवाडी, रत्नागिरी) यांचा १७ जुलै रोजी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. विदुलता वाडकर यांच्या घराकडे जाणारी विजेची तार पडल्याने त्यांच्या घरी अंधार झाला होता. या प्रकरणी त्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली होती. मात्र विद्युतप्रवाह बंद न करता महावितरण कर्मचार्यांनी वीजवाहिनीची वाट साफ करून घ्या असे विदुलता यांना सांगितले होते.
www.konkantoday.com