
दाट धुक्यामुळे अंदाज चुकला, आयशर टेम्पो पलटी होऊन दरीच्या टोकावर थांबला; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात करुळ घाटात आयशर टेम्पोचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरहून सावंतवाडीला येत असताना टेम्पोचा बुधवारी सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला. टेम्पो घाटातील दरीच्या टोकाला येऊन थांबला त्यामुळे चालकासह क्लिनरचे प्राण थोडक्यात बचावले.घाटात असलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून सावंतवाडीला सिमेंटच्या पत्र्याची पाने घेऊन आयशर ट्रक येत होता. करुळ घाटात असलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने ट्रक घाटातील संरक्षक भिंतीला जाऊन धडकला आणि पलटी झाला. भरधाव असलेला ट्रक दरीच्या टोकावर येऊन थांबला. यामुळे ट्रक चालक आणि क्लिनर थोडक्यात बचावले.दरम्यान, ट्रकमधील सिमेंटचे पत्र दरीत कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघेही थोडक्यात बचावले.