
BSNL भारतीय दूरसंचार प्राधिकरण च्या नावाने काही ग्राहकांना कार्ड ब्लॉक करण्याचे मेसेज ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता, खात्याने खुलासा करणे आवश्यक.
( आनंद पेडणेकर ) BSNL भारतीय दूरसंचार प्राधिकरण या मोबाईल कंपनीच्या नावाने काही ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहेत .भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने निलंबित केले आहे. तुमचे सिम कार्ड २४ तासांच्या आत ब्लॉक केले जाईल. ताबडतोब कॉल करा ग्राहकांनी कॉल केल्यावर तो कॉल स्विकारला जात नाही . खाजगी कंपन्यांनी दर वाढवले असल्याने ग्राहक BSNL कडे वळले आहेत असे असताना जुन्या काही ग्राहकांना वरील मेसेज पाठवले जात आहेत याबाबत काही ग्राहकांनी BSNL कार्यालयात संपर्क साधला असता हा फेक मेसेज असल्याचे सांगण्यात येते सरकारी कंपनीचा लोगो वापरून खाजगी कंपन्या हा मेसेज पाठवत असल्याचे बोलले जात असले तरी सामान्य ग्राहकांना या कोल्ड वॉरचा नाहक त्रास सोसावा लागत आहेमात्र अशा प्रकारचे मेसेज हे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही असू शकतात कारण कार्ड ब्लॉक करतो म्हटल्यावर लोक संबंधितांची संपर्क साधतात त्यातून त्यांचे वैयक्तिक माहिती व ओटीपी वगैरे माहिती घेऊन फसवणूक केली जाते असे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत त्यामुळे याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होत आहे