
गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सागरी रो रो सेवा सुरू होणार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सागरी रो रो सेवा सुरू होणार आहे.सध्या सिंधुदुर्गातील विजयदुर्ग बंदरात या सेवेसाठी जेट्टी उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.जेट्टी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट ड्राइव्ह घेण्यात येईल. त्यानंतरच रो रो सेवेचं बुकिंग सुरू केलं जाणार आहे.ही सेवा सुरू झाल्यानंतर गणेशभक्तांना कोकणात प्रवास करण्यासाठी एक नविन आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील ताण आणि प्रवासाचा वेळ यामध्ये लक्षणीय घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.