
कणकवली रेल्वे स्थानकात तिकीट रांगेतून वाद होऊन दोन प्रवाशांमध्ये हाणामारी
कणकवली रेल्वे स्थानकात तिकीट रांगेतून वाद होऊन दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. तुतारी एक्सप्रेस येण्याच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.घटनेची माहिती अशी की, तुतारी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची वेळ झालेली होती.त्यावेळी तिकीट खिडकीपाशी गर्दी वाढलेली होती.
याच दरम्यान एका तरुणाने रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावरून दुसऱ्या तरुणाने त्याला रोखलं आणि बाचाबाची सुरु झाली. काही क्षणांतच वादाने उग्र रूप घेतलं आणि दोघांमध्ये मारहाण झाली.या हाणामारीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. काही वेळासाठी स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.