
अकरावीचे प्रवेशाचे अधिकार प्राचार्यांना द्या, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.
राज्यभर सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयाची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेक नामांकित आणि ग्रामीण भागातील महाविद्यालये अपेक्षेप्रमाणे भरली नसल्याने आता विशेष फेरीतील प्रवेशांचे अधिकार थेट प्राचार्यांना देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी रत्नागिरी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. आर. पाटील आणि सचिव प्रा. दिलीप जाधव यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी शिरभाते यांना निवेदन देण्यात आले.www.konkantoday.com