
संगमेश्वर तालुक्यातील तेये गेल्येवाडीतील तरुणाची आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील तेये गेल्येवाडी येथील २५ वर्षीय प्रशांत नारायण गेल्ये याने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. १६ जुलै रोजी सकाळी ७.४५ वाजता कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
१३ जुलै रोजी प्रशांत संगमेश्वर बाजारात गेला असताना त्याने विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने कसबा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला कणकवलीत डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.www.konkantoday.com